ती ……………………… भाग ५
घरी आल्या नंतर मी घरातल्या सर्वाना सांगितलं कि आज ती मला भेटली होती आणि तिला मी ते पुस्तकही दिल. ती जाम खुश होती. सर्वाना बर वाटलं. मला आता उत्सुकता होती कि तिच्या घरी गेल्यावरची परिस्थिती काय असेल. फारच आतुरतेने मी दुसरया दिवसाची वाट बघत होते . अखेर तो दिवस उजाडला घाईघाईने सार काही आटोपून मी बस कडे गेले. नेमकी बस लागलीच होती नाईलाजाने मी बस मध्ये चढले वाटलं आज काही तिची माझी भेट होत नाही .
एवढ्यात दीदी म्हणून हाक कानावर पडली वळून पहिल तर ती बसली होती . ती ने मला जवळ बोलावलं बसायला जागा दिली आता आम्ही दोघी अगदी शेजारी बसून गप्पा मारू लागलो. ती उत्साहाने सांगू लागली घरी गेल्यावर ती ने ते पुस्तक घरच्यांना दाखवलं , त्यांना हि ते आवडल. तिच्या आईने मला तिच्या घरी चहाला आमंत्रण दिल होत. मी म्हणलं आता लगेच शक्य नाही पण कधीतरी नक्की येईन हो मी. मग तिला विचारलं वाचलस का पुस्तक हो म्हणाली , माझ्या जवळ एक अजून दुसर पुस्तक होत म्हणल," वाच ! बघु जमत का तुला ?" पुस्तकाच नाव तिने बरोबर वाचून दाखवलं. पण आतला मजकूर वाचताना मात्र ती अडखळली . मग मी तिला तो वाचून दाखवला. अशा प्रकारे एक आठवडा भर आमचा अभ्यास बस मध्ये चालू होता. आता ती बऱ्या पैकी वाचत होती थोडस लिहण्याचा प्रयत्न चालू होता तिचा.
कानडी लोक माझ्यामते बोलताना तरी एकच लिंग वापरतात. आपण कस तो आला , ती गेली , ते थांबले आहेत वैगरे म्हणतो त्या ऐवजी ते एकच लिंग नपुसक लिंग वापरतात असा मला बरेच वेळा आढळल आहे. जस कि ते माणूस चढला बघा, ते बाय किती वरडत होत इत्यादी. त्याबातीत तिला किती हि वेळा मी समजावलं तरी ती सवयीने घोळच घालायची . याबाबतीत एक किस्सा घडला.
एके दिवशी बस मध्ये घाईत चढत असताना एक आजी खाली पडल्या ते कुणाच्याही लक्षात आलं नाही . नेमक हीच लक्ष गेल आणि हि ओरडायला लागली , "ए कंडक्टर भवा (म्हणजे भाऊ) , ते पडल बघा पडल रे! ते जोरात ! (तिला काय पडल ते पटकन सांगता येईना , ) ते पडलं बघा बस मधून कि खाली. तिच्या लिंग भेद न करण्यामुळे नक्की काय पडल ते पटकन कोणाच्या हि लक्षात येईना. कोणाच काय पडल म्हणून सगळे वैतागले कंडक्टर म्हणाला काय झाला घोटाळा ! आणि पाहतात तर एक आजी पडल्या होत्या. त्या घाबरल्या होत्या. चालू होत असलेली बस थांबली त्यासरशी हिने टूणकण उडी मारली त्या आजींना हाताला धरून उठवल, बस मध्ये चढवल, बसायला जागा दिली. मला म्हणाली, " किती ओरडत होत मी तरी कोणी लक्ष देईना बघा". तिच्या बोलण्यातला गोंधळ मी तिला समजावत होते ते पाहून बस मधले सगळे तिच्या बोलण्याने हळूहळू हसत होते.
मग ती म्हणाली दीदी आता माझ इथल काम संपल आता मी दुसरी कडे जाणार कामाला. पण मी इथेच राहणार आहे . तुम्हाला भेटायला , मराठी शिकायला येत जाईन मी . मला वाईट वाटलं .मग मी तिला तिच्या कामाच्या ठिकाणी सोडलं, पुढे आले आणि विचार केला हि आता संध्याकाळी भेटली कि जाव हिच्या घरी आज म्हणजे मला कधी वाटल तर तिला भेटता येइल . मग माझं मलाच बर वाटलं .
नंतर मी खूप दिवस वाट पहिली तिची आतुरतेने पण ती काही आली नाही कि तिच्या मैत्रिणीही दिसल्या नाहीत कि तिचा निरोप हि आला नाही. कुठे आणि कस शोधाव तिला ? मला भेटायचं तिला ! या गोष्टीला आता ३ वर्ष झालीत पण मी अजूनही तिच्या शोधत आहे आणि अजूनही ती माझ्या मनात घर करून आहे ? कोणी शोधून देईल का तिला ?