mazya vishayi

थोडेसे माझ्या विषयी ………

नमस्कार  मंडळी !!!!

मी तुमच्या सारखीच एका सर्वसामान्य घरात वाढलेली आहे. ज्या घरात पैसा इतकाच महत्व संस्काराला दिले आहे . माझे   लहानपण चांगल गेले.  थोडी  बहुत सुखदुख सर्वांच्या वाटेला येतात तशी ती माझ्या हि आली .  पण काही गोष्टी मात्र हळव्या स्वभावामुळे  माझ्या मनावर कोरल्या गेल्या . माझ्या व्यक्तिमत्वाला आकार देत गेल्या. त्या कधीतरी व्यक्त व्हाव्यात मन मोकळे करावे असे वाटल्याने हा लेखन प्रपंच………।  

मी काही फार मोठी लेखिका किंवा एखाद्या विषयातली  तज्ञ नाही  किंवा मला आलेले अनुभव हे देखील फार निराळे आणि मोठे नाहीत परंतु त्यांनी मला दिलेले संस्कार  मात्र  माझ्यासाठी महत्वाचे आहेत. काही अनुभव गमतशीर तर  काही विचार करायला लावणारे आहेत. तसे पाहता माझी पदवी हि चित्रकला या विषयातील आहे. चित्र कलेचा आणि लेखनकलेचा तसा फारसा संबंध नाही किबहुना शब्दांपेक्षा चित्र माणसाला अधिक जवळ आणतात असा माझा अनुभव आहे परंतु माझ्या घरात मात्र वाचनाचे संस्कार असल्याने मला थोडी बहुत लेखन आणि वाचनाची आवड आहे. 

आपल्या प्रत्येकाचे स्वताचे असे एक निराळे  जग असते . आणि आपण त्या जगाचे राजे असतो पण जेव्हा  हे जग ओलांडून बाहेरच्या जगाशी सामना करायाची वेळ येते तेव्हा आपल्याला आपली किमत कळते . आणि आपल्या घरातल्यांची हि किमत कळते . त्यावेळीस येणाऱ्या प्रसंगांना आपण जे तोंड देतो त्यावरून आपल व्यक्तिमत्व कळत . 

असेच काही प्रसंग, काही भेटलेल्या व्यक्ती त्यांनी मला दिलेले अनुभव माझ्या नजरेतून ………. वाचा आणि पटले तर अवश्य कळ्वा.  



No comments:

Post a Comment