पास काढण्यात मी नापास !
मी रोज गेली किती तरी वर्ष बहुदा १६ तरी असावीत बसने प्रवास करते. त्यामध्ये गेली ८ वर्षे मी महिन्याला पास काढते. एखादी गोष्ट हि आपल्या सरावाची झाली कि आपण त्याबाबत किती बेफिकीर असतो किंवा काही गोष्टी कशा गृहीत धरतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला कसा भोगावा लागतो याचा अनुभव एकदा नव्हे तर चक्क दोनदा मी घेतला.
त्याचं असं झाल कि, मध्यंतरी बसच्या तिकिटाचे भाव वाढले. आधी महिनाभर पास काढल्यामुळे मला नव्याने पास काढायाच्या वेळेस वाढीव दर नक्की काय असेल याचा अंदाज बांधता आला नव्हता. सहज पणे, स्वतः जराही तसदी न घेता "किती पै से होतात हो ?" असे मी पास काढणाऱ्यास विचारले. इतक्या लोकांच्या हिशेबात हरवलेल्या त्या पी एम टी च्या माणसाने अंदाजे ६२० रुपये असे सांगितले. नेहमी प्रमाणे बसचा नंबर वैगरे सांगून झाल्यावर त्याने पास दिला जराही हिशेबी विचार न करता मी त्याला पैसे दिले आणि लवकर काम झाल्याच्या खुशीत घरी परत आले. संपूर्ण महिना माझा अशा प्रकारे गेला.
पुन्हा पुढच्या महिन्यात पास काढण्यासाठी मी गेले नेहमीप्रमाणे त्याला पास दिला आणि पैसे काढून दीले . पाच - दहा मिनिटे शांततेत गेली , मी विचार केला हा माणूस असा विचित्र काय वागत आहे? त्या माणसाने पासकडे आणि माझ्याकडे संपूर्ण न्याहाळून पाहिले मग म्हणाला " म्याडम हा पास तुम्ही स्वतः काढलात का?" मी आश्चर्याने हो म्हणाले. "का हो ?" गरजेपेक्षा जास्त चौकशी करणाऱ्या माणसाचा मला रागच येतो. "मग तुम्ही नीट तपासला नाहीत वाटत ?" असे त्याने विचारातच मात्र मी गोंधळुन गेले. एव्हाना त्याच्या बोलण्याचा रोख मला हळूहळू लक्षात यायला लागला होता . माझा गोंधळ उडालेला पाहून तो म्हणाला , " अहो म्याडम, हा पास चुकीचा आहे. आता तर माझ्या मागे उभे असणारे लोकहि वैतागले होते. पण आता काहीतरी वादग्रस्त घडणार म्हणून तेही आमच्याकडे उस्तुकतेने पाहू लागले. पुढे गर्दीचा अंदाज घेत तो पटकन म्हणाला, " तुम्ही जास्त पैसे दिले आहेत. तुमच्या मार्गाचे पैसे एवढे होत नाहीत. फ़क़्त ५७६ होतात. तुम्ही हिशेब केला नाहीत का ? बसच्या तिकिटाचा दर फ़क़्त एक रुपयाने वाढला मग एवढे पैसे तुम्ही कसे दिलेत ? तुम्ही शिकलेली लोक जरां पास भरताना नीट बघत जा. " मग त्याने मला सर्व मार्गाचे हिशेब करून दाखवले . मी निरुत्तर होते. मग त्याने माझ्या कडून योग्य ते पैसे घेतले आणि मला नवा पास दिला. माझ्याकडून अर्ज लिहून घेतला. मागे उभे असणारे लोक त्याच्याकडे अभिमानाने आणि मझ्याकडे धांदरटच दिसते अशा नजरेने पाहत होते.
शेवटी स्वताची चूक स्वतालाच भोवल्याने मी सर्व अहंकार बाजूला ठेवून त्याचे आभार मानले. माझ्या धांदरटपणाबद्दल मला खूप हसू आले. असा धांदरटपणा पुन्हा करायचा नाही असे मनोमन ठरविले. पण पुढील आणखी विनोदी प्रसंगाने ते खोटे ठरविले.
शेवटी स्वताची चूक स्वतालाच भोवल्याने मी सर्व अहंकार बाजूला ठेवून त्याचे आभार मानले. माझ्या धांदरटपणाबद्दल मला खूप हसू आले. असा धांदरटपणा पुन्हा करायचा नाही असे मनोमन ठरविले. पण पुढील आणखी विनोदी प्रसंगाने ते खोटे ठरविले.
No comments:
Post a Comment