Wednesday, February 3, 2010

maitree ek aseem vishwas !!!

मैत्री एक असीम विश्वास !!!!
आपल्या आयुष्यात अनेक माणस भेटतात. त्यातील काहीशी आपले स्नेहाचे मैत्रीचे नाते जुलते. माझी अशिच एक मैत्रिण मनीषा शिरोलकर. अगदी थोड़या वेळात आमची घट्ट मैत्री झाली. एकमेकांच्या सुखादुखात आम्ही सहभागी झालो. पण या नात्याची खरी जाणीव झाली ती मात्र एका वेगळ्या प्रसंगात. माझे वडिल अतिशय आजारी होते. हॉस्पिटल मधे त्याना अडमिट केले होते त्यावेलिस माझ्या मदतीला कोणीही न्हवते. तिचा मला फ़ोन आला आणि मला रडू कोसलले. तिला त्यावेलिस चौथा महिना चालू होता .  तरीही ती गरोदर असताना सुद्धा माझ्यासाठी हॉस्पिटल मधे आली. तिने कामावर रजा सांगितली आणि माझ्या वडिलांची अगदी सर्व प्रकारे सेवा केली. पार त्यांचे क्याथ्रेडीरील बदलायाला ही मदत केली. मीच आश्चर्य चकित झाले. केवल काही दिवसाच्या मैत्रीवर इतके प्रेम, आपुलकी !!!. सर्वकाही नीट असूनसुद्धा पाच मिनट बसायला सुद्धा लोक येत नाहीत. किंवा फ़ोन वर साधी चौकशी ही करत नाहीत. पण तिने किंवा तिच्या घराच्यानी ही त्याला विरोध केला नाही हे विशेष. शब्द सुचत नाहीत अशी माणस भेटली की . तेव्हा पासून आजतागायत मैत्रीचा एक अनोखा सुगंध आमच्या नात्यात दर्वलतोय. आणि आमच्यात एकमेकंबद्दल असीम विश्वास आहे. अशी मैत्री सर्वाना लाभों.
आमच्या मैत्रीचा हे नात चिरायु होवो. 

1 comment: