Friday, December 31, 2010
Wednesday, December 29, 2010
Thursday, December 9, 2010
Sunday, June 27, 2010
eka bus chalakas salam !!!
बस ड्राईवर आणि कंडक्टर यांना आपण नेहमीच नावे ठेवतो. ते अरेराविने वागतात. वेळेवर बस आणत नाहीत. सुटे पैसे देत नाहीत. पण सगळी माणस काही सारखीच नसतात म्हणून विशिष्ट प्रकारचा चश्मा लावून सगळ्याकड़े पहाणे चुकीचे आहे. याच उत्तम प्रकारच उदहारण सांगते. एकदा नेहमी प्रमाने मी बस प्रवास करत होते अचानक गलाका सुरु झाला बस थांबली, ड्राईवर आणि कंडक्टर त्या गलाक्या कड़े गेले. लोक वैतागले आणि नाना अफवांचे पीक आले. कोण म्हणे मगाशी बसने एक दुचाकीला उडवले म्हणून त्याने माणस गोला केली. आणि आता आपल्याला उशीर होणार असे आम्हाला वाटू लागले पण लगेच ड्राईवर येताना दिसला. सगळे शांत बसले, गाड़ी सुटली. एकाने न राहवून कंडक्टरला विचारले मगाशी नक्की काय झाले ? तेव्हा तो म्हणाला या ड्राईवरचा मुलगा गाड़ी वरुन पडला तो जरबरदस्त जखमी झाला आहे. त्याला आम्ही एका दुस्र्या माणसाबरोबर हॉस्पिटल मधे पाठवले आहे. आम्ही शर्मीले झालो. काय विचार करत होतो आणि काय झाले ? धन्य त्या ड्राईवरची !!! मुलगा जखमी असताना सुद्धा जराही विचलित न होता त्याने गाड़ी चालवली आणि आम्हा सगळ्याना सुखरूप ऑफिसला आणले. बस मधून उतरल्यावर मी त्यांच्याशी बोलले त्याचे कौतुक केल शिवाय त्याना धीर दिला. त्यांच्यामते वेळेवर गाड़ी आनने त्यांचे कर्तव्य होते. ते त्याना पार पाडायाचे होते. भारता सारख्या भ्रश्त्ताचाराने ग्रस्त देशात अशी ही कर्तव्या पुढे झुकनारी माणस पाहिली की त्यानाच सलाम ठोकावासा वाटतो . त्या बस चालकाचे नाव श्री. विजय तीखे. ही घटना घडली अभिनवच्या बस मधे.
Thursday, February 11, 2010
Wednesday, February 10, 2010
Wednesday, February 3, 2010
maitree ek aseem vishwas !!!
मैत्री एक असीम विश्वास !!!!
आपल्या आयुष्यात अनेक माणस भेटतात. त्यातील काहीशी आपले स्नेहाचे मैत्रीचे नाते जुलते. माझी अशिच एक मैत्रिण मनीषा शिरोलकर. अगदी थोड़या वेळात आमची घट्ट मैत्री झाली. एकमेकांच्या सुखादुखात आम्ही सहभागी झालो. पण या नात्याची खरी जाणीव झाली ती मात्र एका वेगळ्या प्रसंगात. माझे वडिल अतिशय आजारी होते. हॉस्पिटल मधे त्याना अडमिट केले होते त्यावेलिस माझ्या मदतीला कोणीही न्हवते. तिचा मला फ़ोन आला आणि मला रडू कोसलले. तिला त्यावेलिस चौथा महिना चालू होता . तरीही ती गरोदर असताना सुद्धा माझ्यासाठी हॉस्पिटल मधे आली. तिने कामावर रजा सांगितली आणि माझ्या वडिलांची अगदी सर्व प्रकारे सेवा केली. पार त्यांचे क्याथ्रेडीरील बदलायाला ही मदत केली. मीच आश्चर्य चकित झाले. केवल काही दिवसाच्या मैत्रीवर इतके प्रेम, आपुलकी !!!. सर्वकाही नीट असूनसुद्धा पाच मिनट बसायला सुद्धा लोक येत नाहीत. किंवा फ़ोन वर साधी चौकशी ही करत नाहीत. पण तिने किंवा तिच्या घराच्यानी ही त्याला विरोध केला नाही हे विशेष. शब्द सुचत नाहीत अशी माणस भेटली की . तेव्हा पासून आजतागायत मैत्रीचा एक अनोखा सुगंध आमच्या नात्यात दर्वलतोय. आणि आमच्यात एकमेकंबद्दल असीम विश्वास आहे. अशी मैत्री सर्वाना लाभों.
आमच्या मैत्रीचा हे नात चिरायु होवो.

Subscribe to:
Comments (Atom)